अभ्यास... करिअर मार्गदर्शन…व्यक्तिमत्व विकास ... नैतिक मूल्य शिक्षण  
ऑन लाईन पुस्तके खरेदी

“Bharukakachi Patre” Book

Rs.200/-

भारुकाकाची पत्रे’-पत्र स्वरूपातील मराठी पुस्तक
1. ‘भारुकाकाची पत्रे’ या पुस्तकात पत्रांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून ‘करिअर, व्यक्तिमत्व विकास, सकारात्मकता, अभ्यासाच्या पद्धती, नैतिक मूल्य-शिक्षण, पालकांचा सहभाग’ या अत्यंत महत्वाच्या विषयांवरील मुलभूतस्वरूपाचे मार्गदर्शन समाविष्ट आहे. नऊ वर्षांच्या सतत अभ्यास व अनुभवातूनच यातील विषयांची मांडणी जाणीवपूर्वक वअत्यंत प्रभावीपणे करण्यात आली आहे. अशा प्रकारचे अभ्यासपूर्ण दूसरे मार्गदर्शन आज तरी उपलब्ध नाही.

2. प्रत्येक पत्रानंतर त्यातील विषयाचे सार व कृती देण्यात आली असल्याने पुस्तक हे नुसते विचार स्वरुपात न राहता कृतीद्वारे उत्तम परिणाम साध्य करणारा तो प्रगतव्यवस्थापन शास्त्राचा एखादा प्रशिक्षणक्रम ठरतो. 

3. ‘भारुकाकाची पत्रे’ या पुस्तका सोबत मिळणाऱ्याकिट मधील ‘ध्येय प्रतिज्ञा’ व ‘बुक मार्क’वर प्रत्येक विद्यार्थ्याला आपले मार्कांचे व पर्यायाने अभ्यासाचे ‘ध्येय’ लिखित स्वरुपात निश्चित करता येईल. अशा प्रकारे निश्चित केलेले कोणतेही ‘ध्येय’ साध्य करणे व्यवस्थापन शास्त्राच्या नियमानुसार शंभर टक्के शक्य होते. 

4. प्रत्येक विद्यार्थ्याने आपापले मार्कांचे ध्येय निश्चित करून त्यानुरूप विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी सर्व क्षमतेनिशी प्रयत्न केले तर विद्यार्थी आपले मार्कांचे ध्येय व शाळेचा १००% निकाल हि दोन्ही ध्येये हमखास साध्य होऊ शकतात.

5. एखादा विद्यार्थी अभ्यासात मागे पडत असेल आणि पुढे जाऊन तो नापास होणार असेल तर या उपक्रमामुळे आताच तो विद्यार्थी सावध होऊन शिक्षक व पालकांच्या मदतीने जास्त परिश्रम घेऊन संभाव्य अपयश टाळू शकतो.

6. ‘ध्येय शिखर’ हि शब्दरचना विद्यार्थ्यांसह सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायक असून त्यात ‘ध्येय निश्चिती’ पासून तर ‘ध्येय सिद्धी’ पर्यंतचा प्रवास समाविष्ट आहे. 

7. ‘प्रार्थना’:- १०वी-१२वी चे सर्वच विद्यार्थी कमी-अधिक तणावाखाली असतात. यातील अनेक विद्यार्थी एखाद्या परीक्षेत मिळालेल्या कमी गुणांविषयी सतत विचार करीत असतात तर काही विद्यार्थी भविष्यातील येणाऱ्या परीक्षांच्या तणावाखाली वावरत असतात. हि अत्यंत क्लेशदायक अवस्था अक्षरशः परीक्षेपर्यंत, त्यानंतर निकालापर्यंत आणि त्याहीपुढे जाऊन संपूर्ण आयुष्यभर अशा प्रकारची मानसिकता राहू शकते. त्या ऐवजी भूतकाळातील गोष्टी मागे टाकून व भविष्याचा अति विचार न करता वर्तमानात जे-जे म्हणून शक्य आहे ते करण्यावर भर दिला तर व्यक्ति यशस्वी होत जातो आणि त्याला चिंता करण्याची वेळ येत नाही. अशाप्रकारची मानसिकता जोपासण्यासाठी ‘भारुकाकाची पत्रे’ या पुस्तकात दिलेली ‘प्रार्थना’ उपयोगी ठरू शकते. 

लेखक परिचय
नांव:-महेंद्रगौरीकुमारबैसाणे(‘भारुकाका’ या नावाने पत्ररूपी लिखाण)
शिक्षण:- विद्युत अभियांत्रिकीची पदविका तसेच साहित्याची पदवी व व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी. एनएलपी प्रशिक्षित.
नोकरी-व्यवसाय:-
आकाशवाणी-दुरदर्शनमध्ये १९९१ ते २०१२ दरम्यान अभियांत्रिकी विभागात कार्यरत. जानेवारी २०१२ मध्ये तंत्र निदेशक(सहाय्यक अभियंता) दुरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई या पदावरून शिक्षणासारख्या मुलभूत क्षेत्रात योगदान देण्याच्या उद्देशाने स्वेच्छा निवृत्ती. १०वी-१२वी च्या सुमारे ३० लाख विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी मार्गदर्शन करणारे www.bharukaka.com हे महाराष्ट्रातील पहिले मराठी संकेतस्थळ सुरु केले. ‘भारुकाकाची पत्रे’ व ‘टर्निंगपॉईंट’ या पुस्तकांचे लिखाण. १०वी-१२वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘अभ्यासाचे  कॅलेंडर’सहअनेकविध प्रेरणादायी साहित्याची निर्मिती. २०१४ व २०१५ साली नवी मुंबई विभागीय मंडळातर्फेपरीक्षांदरम्यान ऑन लाईन ‘समुपदेशक’ म्हणून नियुक्ती. १०वी-१२वी विद्यार्थी व पालकांसाठी दुरदर्शन व इतर माध्यमांद्वारे मार्गदर्शन-समुपदेशन व कार्यशाळेंचे आयोजन. १०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनातर्फेकरिअर मार्गदर्शन मिळावे यासाठी २००८ पासून पाठपुराव्याला २०१५ साली यश आले. २०१५-१६ पासूनमहाराष्ट्रातील १०वीच्या सर्व म्हणजे सुमारे १५ लाखांच्या वर विद्यार्थ्यांची कलचाचणीशासनातर्फे दरवर्षी घेण्यात येत आहे. तसेच www.mahacareermitra.in हे विविध करिअर्सची माहिती देणारे संकेतस्थळ व हेल्प लाईनसुद्धा शासनामार्फतसुरु करण्यात आली आहे.

 
 
मान्यवरांचे अभिप्राय
  1. डॉ.राजेंद्र बर्वे, सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ व लेखक.

  2. माजी शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री. राजेंद्रजी दर्डा यांच्या शुभेच्छा. 

  3. १०वी-१२वी बोर्डाच्या माजी अध्यक्षा श्रीमती उज्ज्वलादेवी पाटील यांचे प्रास्ताविक. 

 

नापासांसाठी आशेचे किरण
  • माझ्या लाडक्या हुशार पोरांनो !
    मला खात्री आहे या पत्रांमुळे तुम्हाला नक्कीच नवा हुरूप आला असेल.त्याप्रमाणे तुम्ही जोमाने अभ्यासाला लागला असालच!
  • पण एवढे करूनही जेव्हा जेव्हा तुमचा आत्मविश्श्वास डळमळीत होईल तेव्हा तेव्हा आपल्या 'ध्येयशिखर' या शब्दरचनेचं मनन करा.
बिनधास्त बोला ! प्रश्न विचारा

महेंद्र जी .बैसाणे
पत्ता
- गाळा नं. ६७/१०७५, शांती निकेतन सोसायटी, चिकणघर, आर.टी.ओ. रोड, कल्याण-प. ४२१३०१

मो. +91 93215 50286
ई-मेल: info@bharukaka.com

Copyrights © 2011-12, Bharukaka All rights reserved